Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या समर्थनार्थ बेंगळुरूमध्ये कर्नाटक काँग्रेसची ‘तिरंगा रॅली’

  बेंगळुरू : पहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातून भारतीय सैनिकांप्रती एकता आणि समर्थन व्यक्त केले जात आहे. कर्नाटक काँग्रेसनेही ‘तिरंगा यात्रा’ काढून या भावनांना वाट मोकळी करून दिली. आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमधील के.आर. सर्कल येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ‘देशभक्ती दर्शवूया, एकता …

Read More »

आता विराट कोहलीही घेणार कसोटीमधून निवृत्ती?

  मुंबई : रोहित शर्माच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीसीसीआयलाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र असे असले तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने …

Read More »

सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थिनींचा पुनर्मिलन कार्यक्रम उद्यापासून

  बेळगाव : 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी सरस्वती मुलींची हायस्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थिनींचा पुनर्मिलन असा संयुक्त कार्यक्रम उद्या शनिवार दि. 10 व रविवार दि. 11 रोजी आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने जुन्या शाळेच्या जागी नवीन इमारत …

Read More »

बेळगावचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद मेत्री याचा सन्मान

  बेळगाव : थायलंड, पटाया येथे १० ते १३ मे च्या दरम्यान होणाऱ्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची निवड झाली आहे. कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस्, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस्, संजय सुंठकर स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मेत्री यांचा सत्कार झाला. राज्याध्यक्ष संजय …

Read More »

सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित

  नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल फक्त एका आठवड्यासाठी स्थगित केले असल्याची नवी माहिती समोर आली आहे. एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्थान

  नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळून गेला आहे. म्हणूनच तो सतत भारतात अयशस्वी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून …

Read More »

भारताची ड्रोन विमाने इस्लामाबाद, कराचीत पोहोचली; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हलवले

  नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर आणि वेगवान ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. भारतीय सैन्याने गुरुवारी रात्री लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत आत शिरुन ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा या तिघांना सेफ हाऊसमध्ये हलवले आहे. काही जणांच्या मते …

Read More »

पाकिस्तान भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!

  नवी दिल्ली : एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले आहे. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवले. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. …

Read More »

भारताचा लाहोर, बहावलपूरमध्ये ड्रोन हल्ला

  नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील …

Read More »

बेळगावातील मलप्रभा जलाशयाला कडक सुरक्षा व्यवस्था

  बेळगाव : ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशातील आणि राज्यातील सर्व धरणांची आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि बेळगावातील मलप्रभा जलाशयासाठी कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जलाशयांची सुरक्षा आधीच वाढवण्यात आली आहे आणि बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील मलप्रभा धरणासाठी …

Read More »