Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

सौंदत्ती यल्लम्मा देवीस सुवर्णलेपित साडी अर्पण

  बेळगाव : सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीस तब्बल ७० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्तता करत वीरगोट्ट येथील अडविलिंग स्वामीजींनी ४.५ लाख रुपये किमतीची सुवर्णलेपित साडी देवीच्या चरणी अर्पण केली आहे. ही साडी अर्पण करण्यामागे तब्बल ७० वर्षांपूर्वीचा एक धार्मिक संकल्प होता. जंबगी येथील प्रभुदेव डोंगरावर वसलेल्या शिवयोगीश्वरांच्या प्रेरणेने हा …

Read More »

शिवसेनेच्या वतीने बडस येथे मोफत आरोग्य शिबीर

  बेळगाव : हिंदूहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लोक कल्याण मोफत आरोग्य शिबीर सुरु करण्यात आले होते. हे आरोग्य शिबीर बेळगावसह खानापूर मधील जवळपास सत्तरहून अधिक गावात राबविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील आरोग्य शिबिराची सांगता आज इनाम बडस ता. बेळगाव …

Read More »

श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  खानापूर : कारलगा पंचक्रोशीतील श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळ हे गेले सहा दशकावून अधिक काळ भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषा कला व संस्कृतीचे जतन करीत आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे कार्य आजतागायत निरंतर चालू आहे. खानापूर तालुक्यात खेडोपाडी भजनी भारुडाचे सादरीकरण करत समाज प्रबोधनाचे काम या भजनी …

Read More »

निपाणीतील डॉ.आंबेडकर विचार मंचतर्फे निरंतर पुस्तक वाचनाने महापुरुषांना अभिवादन

  निपाणी (वार्ता) : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक महापुरुषांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. त्यामुळे समाजाला वैचारिक वारसा देण्याचा प्रयत्न झाला‌. शिवाय प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याची क्षमता महापुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये होती. ही कार्यक्षमता केवळ महापुरुषांनी वाचन क्षमतेच्या जोरावरती केली. त्यामुळे येथील डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे शुक्रवारी (ता. ११) येथील …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे ग्रंथालय व प्रयोगशाळा नुतनीकरणाचे उद्घाटन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रशस्त ग्रंथालय व प्रयोगशाळेच्या नुतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.. महात्मा फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.राजाभाऊ पाटील, प्रमुख पाहुणे श्री.जयंत नार्वेकर, श्री. सुभाष ओऊळकर, डॉ.पी.डी. काळे, …

Read More »

४० टक्के कमिशन आरोप; चौकशीसाठी एसआयटी स्थापन्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

  बंगळूर : राज्यातील मागील भाजप सरकारवर ४० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप होता. या आरोपावर न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे अधिक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना कायदा …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत वादग्रस्त जात जनगणना अहवाल सादर

  १७ च्या विशेष बैठकीत अंतिम निर्णय; अभ्यासासाठी सर्व मंत्र्यांना देणार अहवालाची प्रत बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी वादग्रस्त सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण, ज्याला जात जनगणना म्हणून ओळखले जाते, ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले. त्यावर आता १७ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम चर्चा केली जाईल. कर्नाटक …

Read More »

‘शांताई’च्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उत्साहात

  बेळगाव : विविध देणगीदारांच्या माध्यमातून शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कारंजी मठाचे प.पू. श्री गुरुसिद्ध स्वामीजी, हुक्केरी मठाचे प.पू. श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, उद्योजक दिलीप …

Read More »

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 13 वा दीक्षांत समारंभ संपन्न

  बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 13 वा दीक्षांत समारंभ आज बेळगावच्या व्हीटीयू येथील एपीजे अब्दुल कलाम सभागृहात पार पडला. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू माननीय थावरचंद गेहलोत आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी समारंभाचे उद्घाटन केले. श्री दुरदुंडेश्वर सिद्धसंस्थान …

Read More »

कीटकनाशक खाल्ल्याने बैलहोंगल येथील नवविवाहित महिलेचा बिम्समध्ये मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इंचळ गावातील एका नवविवाहित महिलेने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र उपचाराविना सदर महिलेचा शुक्रवारी बिम्समध्ये मृत्यू झाला. लक्ष्मी मंजुनाथ हुगार (22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मीचा विवाह तिच्या मामाचा मुलगा मंजुनाथ याच्याशी डिसेंबरमध्ये झाला. लग्नानंतर पाच महिन्यांतच नवविवाहितेने आत्महत्या …

Read More »