Friday , May 16 2025
Breaking News

निपाणीतील डॉ.आंबेडकर विचार मंचतर्फे निरंतर पुस्तक वाचनाने महापुरुषांना अभिवादन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक महापुरुषांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. त्यामुळे समाजाला वैचारिक वारसा देण्याचा प्रयत्न झाला‌. शिवाय प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याची क्षमता महापुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये होती. ही कार्यक्षमता केवळ महापुरुषांनी वाचन क्षमतेच्या जोरावरती केली. त्यामुळे येथील डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे शुक्रवारी (ता. ११) येथील नगरपालिका जवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पुस्तक वाचन करून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. या उपक्रमाला शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कपिल कांबळे यांनी धम्मवंदना सादर केली. प्रा. सुरेश कांबळे यांनी, सध्या शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांची जयंती केवळ जयंती पुरतेच मर्यादित न ठेवता निरंतरपणे त्यांचे आचार विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. सध्या चुकीच्या दिशेने जाणाऱ्या युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. डॉ. कपिल राजहंस यांनी मनोगत केले.
उपक्रमामध्ये माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. जे. डी. कांबळे, प्रा. डॉ. एन. डी. जत्राटकर, सामाजिक कार्यकर्ते गणी पटेल, आय. एन. बेग, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, विजय शेटके, नगरसेवक विलास गाडीवड्डर, उपनिरीक्षिका उमादेवी, गौडा, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, उपनिरीक्षक रमेश पवार, नगरपालिका आयुक्त दीपक हरदी, रयत संघटनेचे राज्यध्यक्ष राजू पोवार, किरण कोकरे, म.‌ ए. समितीचे जयराम मिरजकर, अरुण आवळेकर, नगराध्यक्षि सोनल कोठाडिया, व्हीएसएमचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, राजू मेस्त्री यांच्यासह आजी, माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला. मिथुन मधाळे आणि दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप माने यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त निपाणीतील शोभायात्रेला समाज बांधवांची गर्दी

Spread the love  निपाणी (वार्ता) : अहिंसा परमो धर्मः असा संदेश देणाऱ्या तसेच संपूर्ण जगाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *