Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कर्तृत्वाचा कौतुक सोहळा शनिवारी

  बेळगाव : तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा महिलांच्या कार्याचा गौरव समारंभ केला जातो. याही वर्षी हा समारंभ कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या डॉक्टर शकुंतला गिजरे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम …

Read More »

पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणारा युवक ताब्यात

  बेळगाव : बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका युवकाने दगडफेक केल्याची घटना काल रात्री घडली. यासिर युसुफ नेसरगी वय 19 असे त्याचे नाव असून असून ते उज्वल नगर बेळगावचा रहिवाशी आहे. बुधवारी रात्री बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरावर त्याने दगडफेक करताना त्याला जमावाने रंगेहाथ …

Read More »

हजारो भक्तांच्या उपस्थितीत सुळेभावी श्री महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ…

  बेळगाव : सुळेभावी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी यात्रेला हजारो भक्तांच्या उपस्थितीत काल मंगळवारपासून अपूर्व उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त देवीच्या मंदिरासह संपूर्ण गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण सुळेभावी गाव प्रकाशात …

Read More »

रंग खेळून आंघोळीसाठी विहिरीवर गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

  चिक्कोडी : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग खेळून झाल्यावर विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एकसंबा येथे घडली आहे. वेदांत हिरेकोडी (वय 11) आणि मनोज कल्याणी (वय 9) अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी शहरातील रंगपंचमीनिमित्त रंग खेळणारी मुले विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेली असताना ही …

Read More »

बैलहोंगल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद!

  बेळगाव : कित्तूर विकास प्राधिकरणाला 200 कोटी देण्यात यावे या मागणीसाठी बैलहोंगल पूर्णत: बंद पाळून रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. चन्नम्मा समाधी स्थळापासून निघालेली ही रॅली बाजार रोड, मेदर गल्ली, मरडी बसवेश्वर मंदिर, धारवाड बायपास रोड, चन्नम्मा सर्कल, एपीएमसी गणेश मंदिर, इंचल क्रॉस, बस स्टँड मार्गे रायण्णा सर्कलवर …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनतर्फे दिव्यांग जलतरण प्रशिक्षणार्थींना अल्पोपहाराचे आयोजन

  बेळगाव : जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेचे ज्येष्ठ सभासद कैलासवासी तात्या रामचंद्र पवार यांचे चिरंजीव कैलासवासी चंद्रकांत पवार व नात कैलासवासी अवंती पवार यांच्या स्मरणार्थ दिव्यांग मुलांसाठी जलतरण शिबिराचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी नाष्ट्याची सोय केलेली होती. संघटनेचे माजी संचालक श्री. विश्वास पवार यांनी जायंट्स ग्रुपच्या वतीने …

Read More »

कुमारस्वामींच्या फार्महाऊसचे अतिक्रमण हटवण्याची तयारी

  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई बंगळूर : केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर यापूर्वी रामनगरातील बिडदी येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. अतिक्रमण हटवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभाग आता अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करत आहे. महसूल विभाग अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करत आहे. राज्य सरकारने एखाद्या …

Read More »

मुस्लिमांना सरकारी कंत्राटामध्ये आरक्षणाचे विधेयक विधानसभेत सादर

  बंगळूर : सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आणि मागासवर्गीयांना वस्तू आणि सेवांमध्ये आरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, सार्वजनिक वस्तू आणि सरकारी कंत्राटांमध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी आज विधानसभेत विधेयक …

Read More »

उद्योजक गोविंद टक्केकर यांच्याकडून श्री चांगळेश्वरी हायस्कूलला प्रोजेक्टर भेट

  बेळगाव : सुळगा येथील उद्योजक व प्रसिद्ध समाजसेवक श्री. गोविंद टक्केकर यांनी आजच्या आधुनिक युगात शिकण्यासाठी व शिक्षण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी नवीन तंत्रज्ञान युक्त शिक्षण मिळावे यासाठी श्री चांगळेश्वरी हायस्कूलला एक प्रोजेक्ट भेट दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, धैर्य ठेवून अभ्यास करा प्रामाणिकपणे केलेला अभ्यास तुम्हाला …

Read More »

धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा एनएसएस राज्य पुरस्कार

  बंगळुरू : राष्ट्रीय सेवा योजनेतील उल्लेखनीय कार्यासाठी गोगटे वाणिज्य महाविद्यालय, टिळकवाडी, बेळगाव आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावच्या स्वयंसेविका धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय सर्वोत्तम एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २०२२-२३ या वर्षासाठी दिला गेला असून, त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांची राज्यातील सर्वोत्तम …

Read More »