Sunday , July 26 2026
Breaking News

पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणारा युवक ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका युवकाने दगडफेक केल्याची घटना काल रात्री घडली. यासिर युसुफ नेसरगी वय 19 असे त्याचे नाव असून असून ते उज्वल नगर बेळगावचा रहिवाशी आहे.

बुधवारी रात्री बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरावर त्याने दगडफेक करताना त्याला जमावाने रंगेहाथ पकडून खांबाला बांधून घातले होते. सदर युवकाला ताब्यात घेत सुरक्षितरित्या पोलीस स्थानकात हलवले. या 19 वर्षीय युवकाने मंदिराच्या गेटवर दगड फेकला होता. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी प्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या युवकाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने मंदिराच्या गेटवर दगडफेक केली. होळी दरम्यान युवकाने बुरखा पोशाख परिधान केला होता त्या घटनेचा बदला घेण्यासाठी मंदिराच्या गेटवर दगडफेक केली आहे. सदर युवकावर मानसोपचाराकडे उपचार देखील सुरू आहेत. याप्रकरणी सदर युवकावर मार्केट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराच्या गेटवर दगडफेक झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते मात्र मार्केट पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आधी सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *