Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

माजी विद्यार्थ्यांकडून छत्रपती संभाजी हायस्कूल, बैलूरला विज्ञान प्रयोगशाळेसाठी २३ उपकरणांची भेट

  बैलूर : छत्रपती संभाजी हायस्कूल, बैलूर येथील २०१३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी तब्बल २३ अत्यावश्यक व अत्याधुनिक विज्ञान उपकरणांची भेट दिली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगाधारित शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. या भेटीत मायक्रोस्कोप, प्रोजेक्टर, मानवी सांगाडा (Human Skeleton), पचनसंस्था …

Read More »

बेळगाव दक्षिण व बेळगाव तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : वीज विभागाच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बेळगाव दक्षिण विभागासह बेळगाव तालुक्यात उद्या (रविवार, दि. 16) सकाळी 10 ते सायं. 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. हेस्कॉमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्य लाईनचे बळकटीकरण, दुरुस्त्या, ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स, झाडांच्या फांद्या कापणे, उपकरणांची तपासणी या कारणास्तव वीजपुरवठा ठप्प करण्यात येणार …

Read More »

काव्यशेकोटी संमेलन – 2025 : नवोदित कवींना सुवर्ण संधी!

  बेळगाव (प्रतिनिधी) : शब्द, निसर्ग आणि भावना यांच्या संगमात नटलेली काव्यप्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी नवोदित कवींसाठी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर यांच्या सौजन्याने, तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “काव्यशेकोटी संमेलन – 2025” हा भव्य आणि बहारदार काव्योत्सव रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी …

Read More »

गाव व्यसनमुक्त व्हावे, खेळातून करिअर घडावे हाच मुख्य उद्देश : प्रसाद पाटील

  खानापूर : बालदिनाचे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या पुढाकाराने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थितीत 50 स्पोर्ट्स जर्सी आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या. गाव व्यसनमुक्त व्हाव, खेळांची आवड निर्माण व्हावी, खेळातून करिअर घडावे, हाच …

Read More »

लालवाडी – चापगाव आणि चापगाव – आवरोळी रस्त्याच्या दुरुस्तीस प्रारंभ

  शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या मागणीला प्रतिसाद सततच्या आणि अतिरिक्त पावसामुळे लालवाडी ते चापगाव आणि चापगाव ते आवरोळी या मार्गांवरील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. वाहतुकीला अडचण होत होती. या रस्त्यानेच उसाच्या ट्रकांची वाहतूक होत असते त्यालाही अडथळा निर्माण झाला होता. याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष …

Read More »

आयटी क्षेत्र बेंगलोर शहराबाहेर विस्तारित करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन जाहीर; भाडे–करात सवलती

  बेळगाव : कर्नाटक सरकारने बेंगलोर वरील ताण कमी करण्यासाठी आयटी क्षेत्र बेंगलोर शहराबाहेर विस्तारित करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन जाहीर केली असून त्याचा फायदा राज्यातील सात मोठ्या शहरांना होणार आहे. असे झाल्यास भविष्यात बेळगाव सारख्या शहरात नवीन आयटी पार्क रोजगार संधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. …

Read More »

भूतरामनहट्टी राणी कित्तूर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात 28 हरणांचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव शहरालगत असलेल्या भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणी संग्रहालयात तब्बल 28 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत हरणांचा आकडा मोठा असल्याने प्राणी संग्रहालयातील वातावरण सध्या चिंताजनक बनले आहे. हरणांच्या मृत्यूचे कारण संसर्गजन्य असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. सदर हरणांचा मृत्यू एखाद्या जिवाणूच्या …

Read More »

कॉलेज रोड परिसरात बर्निंग कारचा थरार

  बेळगाव : कॉलेज रोड परिसरात थांबलेल्या स्थितीत असलेल्या एका कारने अचानक आग घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आणि लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासानुसार, आग लागण्याचं कारण शॉर्ट …

Read More »

विठ्ठल मंदिर वडगांव येथे भगिनी निवेदिता जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : बाजार गल्ली वडगांव येथील विठ्ठल मंदिरमध्ये सामाजिक समरसता मंच व श्री विठ्ठल मंदिर विकास समिती संयुक्त विद्यमाने भगिनी निवेदिता जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी जीवन विद्या मिशनच्या प्रवचनकार सौ.सुजाता यल्लुसा जितुरी, अध्यक्ष व प्रमुख वक्त्या सौ. स्वरुपाताई ईनामदार, विधान परिषद सदस्य व अखिल …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या माधुरी पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन प्रवासाबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात वेगवेगळे प्रसंग सांगितले. आपल्या जीवनात संयम, कठीण परिस्थिती वेळी तोंड देण्याची हिंमत पंडित जवाहरलाल नेहरूंची होती हेही त्यांनी सांगितले. …

Read More »