Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कॉलेज रोड परिसरात बर्निंग कारचा थरार

  बेळगाव : कॉलेज रोड परिसरात थांबलेल्या स्थितीत असलेल्या एका कारने अचानक आग घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आणि लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासानुसार, आग लागण्याचं कारण शॉर्ट …

Read More »

विठ्ठल मंदिर वडगांव येथे भगिनी निवेदिता जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : बाजार गल्ली वडगांव येथील विठ्ठल मंदिरमध्ये सामाजिक समरसता मंच व श्री विठ्ठल मंदिर विकास समिती संयुक्त विद्यमाने भगिनी निवेदिता जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी जीवन विद्या मिशनच्या प्रवचनकार सौ.सुजाता यल्लुसा जितुरी, अध्यक्ष व प्रमुख वक्त्या सौ. स्वरुपाताई ईनामदार, विधान परिषद सदस्य व अखिल …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या माधुरी पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन प्रवासाबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात वेगवेगळे प्रसंग सांगितले. आपल्या जीवनात संयम, कठीण परिस्थिती वेळी तोंड देण्याची हिंमत पंडित जवाहरलाल नेहरूंची होती हेही त्यांनी सांगितले. …

Read More »

सामाजिक समरसता मंच वतीने भगिनी निवेदिता जयंती साजरी

  बेळगाव : मरगाई मंदिर भांदुर गल्ली येथे गुरुवार दिनांक ६रोजी सामाजिक समरसता मंच वतीने भगिनी निवेदिता जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.अरुणा काकतकर, प्रमुख वक्त्या स्नेहल कालकुंद्री तसेच विधान परिषद सदस्य व सामाजिक समरसता मंच भारतीय टोळी सदस्य श्री. साबण्णा तलवार आणि संघ प्रांत प्रचारक व …

Read More »

समर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूलची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक झेप

  खानापूर : समर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूलने जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत यश मिळवत ऐतिहासिक झेप घेतली व तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी राज्य पातळीवर पाठवण्याचा विक्रम बनविला. तब्बल 22 विद्यार्थी जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटातून मुलींच्या संघाने 10-2 अशी बाजी मारत राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला. तसेच 14 वर्षीय वयोगटातून 17 वयोगटातून …

Read More »

बनावट कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी

  बेळगाव : बेळगावमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या ३३ आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बॉक्साईट रोडवरील एका खाजगी इमारतीत हे अवैध कॉल सेंटर ८ मार्च २०२५ पासून …

Read More »

बेळगावात गांजा सेवन आणि मटका जुगारावर पोलिसांचा छापा

  तिघांवर गुन्हे दाखल बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या स्वतंत्र धडक कारवाईत मादक पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर मटका जुगार याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. रुक्मिणीनगर, ५ व्या क्रॉसनजीक माळमारुती पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आनंद …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये स्फोट ९ जणांचा मृत्यू

  जम्मू : दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर …

Read More »

रोशनी बामणे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथील एम. व्ही. जिल्हा अंतर्गत क्रीडांगण स्टेडियममध्ये सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या मन्नूर व गोजगे शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रोशनी बामणे हिचा प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला असून तिला …

Read More »

महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण : शिवानी पाटील

  खानापूर : स्त्रियांना हवे तसे जगायला मिळणे म्हणजे खरे सक्षमीकरण नव्हे, तर महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण होय, असे मत म. ए. समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी व्यक्त केले. श्रमिक अभिवृद्धी जनजागृती संघाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून शिवानी पाटील बोलत …

Read More »