Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शेवाळे येथे संचिता संतोष गावडे होम मिनिस्टर पैठणी विजेती

  शिवाळे (ता. चंदगड) येथील ॐकार नवचैतन्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी “होम मिनिस्टर” स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संचिता संतोष गावडे यांनी विजेतेपद पटकावले, तर संगिता भैरू पाटील उपविजेती ठरली. संचिता …

Read More »

पाटणे फाटा येथे ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पायाभरणी संपन्न

  चंदगड तालुक्याच्या आरोग्याचा प्रश्न सुटला तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड तालूक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या सुसज्ज हॉस्पीटलचा प्रश्न आज मार्गी लागला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने पाटणे फाटा येथील एमआयडीसीमध्ये चार एकर जागेवर 34 कोटी रुपये खर्चून ट्रॉमा केअर सेंटर या जिल्हा आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राच्या पायभरणीचा समारंभ राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा …

Read More »

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!

  मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्ती घटक समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी व …

Read More »

अनुष्का आपटेला महाराष्ट्र राज्य (संगीत) नाट्य स्पर्धेत रौप्य पदक

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा समारंभ दिनांक 9/10/2024 रोजी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि सदा सरवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने “सं. लावणी भुलली अभंगाला” या भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे …

Read More »

नोएल टाटा होणार रतन टाटा यांचे उत्तराधिकारी

मुंबई : रतन टाटा यांनी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलेल्या टाटा ट्रस्टचा नवा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील. रतन टाटा हे 1991 …

Read More »

उचगाव मराठी साहित्य संमेलन १२ जानेवारी रोजी

  बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २३ वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी भरविण्याचा निर्णय अकादमीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर हे होते. यावर्षी दिग्गज अशा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन साजरे करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीमध्ये इतर साधक, बाधक …

Read More »

श्री दुर्गा माता दौडीतून नारीचा शक्तीचा संदेश!

  बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेळगावात अखंड श्री दुर्गा मातादौडचे २६ वे वर्ष पार पडले. आज ९ व्या दिवशी श्री दुर्गा माता दौडीला बेळगाव शहरातील ताशिलदार गल्ली, श्री सोमनाथ मंदिर येथून श्री सिद्धिदात्रीच्या पूजेसह प्रदक्षिणा घालण्यात आली. श्री दुर्गामाता दौड …

Read More »

कडोली साहित्य संमेलन ५ जानेवारीला

कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे ४० वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. बैठकीत 40 व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनातील विविध सत्रे, साहित्यिक, पाहूणे …

Read More »

प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना अटक : सात लाखाचे दागिने जप्त

  बेळगांव : प्रवाशांना लुटून सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रिजवान सिराज पठाण (वय ४०, विद्यानगर, एपीएमसी, बेळगाव), मलिकजान दस्तगीरसाब शेख (वय २६, मूळचा गोकाक सध्या राहणार एपीएमसी) आणि विनायक अरुण हिंडलगेकर (वय ३२, सध्या राहणार जुने गांधीनगर) …

Read More »