Monday , September 21 2026
Breaking News

कडोली साहित्य संमेलन ५ जानेवारीला

Spread the love

कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे ४० वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.
साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. बैठकीत 40 व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
संमेलनातील विविध सत्रे, साहित्यिक, पाहूणे आदीबाबत कार्यकर्त्यानी सूचना मांडल्या. साहित्यिक व पाहुण्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याचे ठरले. संमेलनाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी शनिवार ता. १२ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *