Wednesday , March 26 2025
Breaking News

नोएल टाटा होणार रतन टाटा यांचे उत्तराधिकारी

Spread the love

मुंबई : रतन टाटा यांनी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलेल्या टाटा ट्रस्टचा नवा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील. रतन टाटा हे 1991 पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आणले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर ही धुरा आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे..

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पॅरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्त्वात ट्रेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला.

About Belgaum Varta

Check Also

‘जणू जगच जिंकले’, अंतराळवीर सुनीता विलियम्स परतीच्या वाटेवर!

Spread the love  नवी दिल्ली : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *