Sunday , July 26 2026
Breaking News

उचगाव मराठी साहित्य संमेलन १२ जानेवारी रोजी

Spread the love

 

बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २३ वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी भरविण्याचा निर्णय अकादमीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर हे होते. यावर्षी दिग्गज अशा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन साजरे करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीमध्ये इतर साधक, बाधक चर्चा करण्यात आली. बैठकीत चर्चा करून संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी अकादमीचे उपाध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील तसेच कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन एन. ओ. चौगुले यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *