Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : दर्शनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; १४ ला निकाल

  बंगळूर : चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता दर्शनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली आणि १४ ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला. ५७ व्या सीसी न्यायालयाने दर्शनने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि आरोपीचे वकील सी. व्ही. नागेश आणि एसपीपी प्रसन्न कुमार यांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय …

Read More »

कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजप सरकारच्या काळातील गैरव्यवहार बंगळूर : भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. गुरुवारी विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले …

Read More »

सिद्धरामय्या कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात : विजयेंद्र

  बेळगाव : सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले की, हरियाणातील जनतेने मोदींच्या हमीभावावर विश्वास ठेवून काँग्रेसला नाकारले आहे. हा विजय महाराष्ट्राच्या निवडणुकीतही भाजपचा वरचष्मा ठरेल, असा विश्वास विजयेंद्र यांनी व्यक्त केला. जम्मूमध्ये भाजपचा …

Read More »

देशाचे अनमोल ‘रतन’ अनंतात विलीन

  मुंबई : उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाह वरळी येथील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी आले. यावेळी …

Read More »

येडूर वीरभद्र देवस्थानची निपाणीत बनवली १५० किलो चांदीची पालखी

  निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षात अनेक देवस्थानमध्ये यात्रा, जत्रा आणि उत्सवासाठी चांदीपासून बनविलेल्या पालख्यांचा वापर सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी सराफ पेढीचे सुरेश शेट्टी आणि रवींद्र शेट्टी यांनी येडूर येथील वीरभद्र देवस्थान साठी तब्बल १५० किलो वजनाच्या चांदीची पालखी बनवली आहे. माजी खासदार डॉ. …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे

  पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील पाणी प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी किमान दिवसाला दोन तास तरी पाणी मिळावे, यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. शिवाय निवेदने दिली गेली. तरीही कोणतीच कार्यवाही न झाल्याने नागरी हक्क कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, झाकीर कादरी, …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले दुर्गा देवीचे पूजन

  बेळगांव : बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात सहभागी होऊन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी देवीचे पूजन केले. महाप्रसादाचे वाटप केले. बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात तालुका समिती युवा आघाडीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त समितीच्या नूतन पदाधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होत. समितीचे कार्याध्यक्ष संतोष मंडलिक आणि खजिनदार मल्लाप्पा पाटील यांच्या …

Read More »

हिप्परगी जलाशयाच्या गेटवर तांत्रिक बिघाड! पाण्यामुळे गेट बंद करण्यात मोठी अडचण

  बेळगाव : सीमावासीयांची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णाला आता पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्याचे कारण म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे बांधण्यात आलेल्या हिप्परगी बॅरेजमध्ये आता तांत्रिक बिघाड झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. अथणी तालुक्यातील हिप्परगी बॅरेजचे 21 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता केवळ सातवा दरवाजा …

Read More »

२० वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ५ जानेवारी रोजी

  मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक नुकतीच साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये प्रारंभी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

भर पावसात श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित आठव्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात ध. संभाजी महाराज चौक येथून झाली. यावेळी ध. संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर ध्वज चढविण्यात आला. नंतर प्रेरणा मंत्र म्हणून भर पावसात दौडीला प्रारंभ झाला. त्यानंतर ही दौड बसवान गल्ली, गणपती गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे …

Read More »