बेळगांव : बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात सहभागी होऊन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्यांनी देवीचे पूजन केले. महाप्रसादाचे वाटप केले.
बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात तालुका समिती युवा आघाडीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त समितीच्या नूतन पदाधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले होत. समितीचे कार्याध्यक्ष संतोष मंडलिक आणि खजिनदार मल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. युवा आघाडी शाखा अध्यक्ष रामा आमरोळकर आणि ग्रामपंचायत सदस्य राजू किणेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी मयूर बसरीकट्टी, बाबाजी देसूरकर, मल्लाप्पा पाटील, डॉ. राजगोळकर, अंकुश पाटील, महादेव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील भाविक, दुर्गा देवी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.