Sunday , September 20 2026
Breaking News

पावसाचे संकेत देणाऱ्या चातक पक्षाच्या आगमनाने निपाणी परिसरातील शेतकरी आनंदी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : पावसाचे संकेत देणाऱ्या चातक पक्षाचे निपाणी परिसरातील शिवारात आगमन झाले आहे. त्यामुळे मान्सून यंदा वेळेवर सुरू होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यासह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत या भागात पावसाच्या सरी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळे मान्सून पावसाकडे लागले आहेत.
निपाणी परिसरात दरवर्षी चातक पक्षी मान्सून येण्याच्या १० ते १५ दिवस अगोदर येतात. हे पक्षी आले की, पूर्वी शेतकरी शेतामध्ये बियाणे पेरणीच्या लगबगीला लागत होते. हे पक्षी आल्यावर मान्सून येणार हे निश्चित होते, असा त्यांचा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. याशिवाय त्यांच्या आवाजावरून पाऊस किती व कसा पडेल याचाही अंदाज जुने जाणते शेतकरी लावत आहेत.
परिसरात मान्सून पूर्व आगमन झाले आहे. हे पक्षी दक्षिण आफ्रिका व श्रीलंकवरून मान्सूपूर्वी भारतात स्थलांतर करतात.
——————————————————————–
‘आधुनिक हवामान प्रणालीपेक्षा पाऊस, वादळ, भूकंप या निसर्गातील घडामोडीचा अचूक अंदाज आपले पूर्वज याच निसर्गचक्रातून घेत होते. त्यानुसार शेतीचे व इतर गोष्टींचे नियोजन केले जात आहे. या निसर्गचक्रातील चातक पक्षी, मुंग्या, आस्त्रे (मासोळ्या खागारी बार), हुडी मैना, साप यासारख्या पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संकेत यावर पूर्वज विश्वास विश्वास ठेवत होते. या आधुनिक विज्ञान युगात हे समज आता बदलत चालले आहे. चातक पक्षाच्या स्थलांतरामुळे मान्सून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.’
-फिरोज चाऊस,
अध्यक्ष, सृष्टी पर्यावरणवादी संघटना निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *