Sunday , July 26 2026
Breaking News

हेम्माडगा बससेवा अखेर सुरू; ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम

Spread the love

 

खानापूर : हेम्माडगा गावासाठी नवीन बससेवा आज सोमवारपासून सुरू करण्यात आली असून, यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. हेमडगा ग्रामस्थांची ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

पंचहमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमडगा बससेवा सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला होता. विजय मादार यांच्यासह अनेक नागरिकांनी यासंदर्भात त्यांची भेट घेतली होती. तसेच पंचहमी योजनेच्या मासिक बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

डेपो व्यवस्थापकांनी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजपासून हेम्माडगा मार्गावरील नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सकाळी ८ वाजता हेम्माडगा येथे पोहोचून तेथून खानापूरकडे परतणार आहे.

कुलकर्णी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी विजय मादार यांनी पुन्हा भेट घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर तातडीने डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधून पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर आजपासून बससेवा सुरू झाली.

या नव्या बससेवेमुळे हेम्माडगा व परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना खानापूर येथे ये-जा करणे अधिक सोयीचे होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *