Monday , June 8 2026
Breaking News

बोरगांव येथे गोरक्षक समितीतर्फे ३ गायींची सुटका; सदलगा पोलिस ठाण्याची सतर्कता

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्याकडे बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेल्या तीन गायींची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणात सदलगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून वाहन जप्त केले असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडगावमार्गे एका टेम्पोमधून दोन व्यक्ती गायी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक समितीला मिळाली. त्यानुसार समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग करून तत्काळ सदलगा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गायी आढळून आल्या. याप्रकरणी शब्बीर सैपन शेख व बापुसाब लालासाब शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर गायी कसाईखान्याकडे नेल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्परतेने कारवाई केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन जप्त करण्यात आले असून गायींची सुटका करून त्यांना सदलगा येथील गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले आहे.
सदर वाहतूक कर्नाटक नोंदणी क्रमांक (के ए २३, बी. ३८४५) असलेल्या टेम्पोमधून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे तीन मुक्या जनावरांना जीवदान मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या कारवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. भविष्यात गोवंशाची संशयास्पद वाहतूक आढळल्यास त्वरित गोरक्षक समिती अथवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख अक्षय पवार यांनी केले आहे.
घटनास्थळी गोरक्षक समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदलगा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

साहित्य हा समाजाचा आरसा; संमेलनाध्यक्ष साताप्पा सुतार

Spread the love  मानकापूरमध्ये साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. देव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *