Sunday , September 20 2026
Breaking News

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक संघटनेतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकालात काढण्याच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक अनुदानित शाळा-महाविद्यालय कर्मचारी संघाच्या चिकोडी जिल्हा संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना गोकाक येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेचे राज्याध्यक्ष जी. हनुमंतप्पा म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करावी. अनुदानित शाळा-महाविद्यालय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य संजीवनी योजना सुरू करावी. रिक्त पदे तत्काळ भरावीत. सरकारी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा अनुदानित शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची सरकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

जिल्हाध्यक्ष आदमअली पिरजादे यांनी, विविध मागण्यांसाठी गेली १५ वर्षे सातत्याने लढा देत आहोत. मागील सरकारच्या काळात आम्ही सलग १४१ दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी एका शिक्षकाने नैराश्यातून बंगळूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या केली. आणखी दोघांनी फ्रीडम पार्क येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी राज्य कार्याध्यक्ष रामू गूगवाड, तालुका अध्यक्ष सतीश आरभावे, अशोक नायक, एस. आय. कळसन्नावर, अमित बाळगौडा, राजू पाटील, महेश खोत, रामचंद्र चव्हाण, संदीप कांबळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *