Sunday , July 26 2026
Breaking News

लक्ष्मी हेब्बाळकर यांना पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी : व्यंकट पाटील

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी उचगाव ब्लॉक युवा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला, बालक आणि समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. महिला व बालविकास मंत्री म्हणून त्यांनी विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्ती’ योजनेमुळे लाखो महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून त्यांच्या आर्थिक बचतीबरोबरच सामाजिक सक्षमीकरणालाही चालना मिळाली आहे. तसेच ‘गृहलक्ष्मी’ योजनेद्वारे कुटुंबप्रमुख महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळत असून लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

महिलांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, स्वावलंबन, अंगणवाडी सेवांचे सक्षमीकरण आणि बालकल्याणाच्या विविध उपक्रमांतही हेब्बाळकर यांनी सातत्याने पुढाकार घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.

कर्नाटकच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या महिलेला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त करत, लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नेतृत्व, प्रशासनातील अनुभव आणि जनसामान्यांशी असलेला संपर्क लक्षात घेता त्या या पदासाठी सक्षम उमेदवार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यातील महिला, युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी लक्ष्मी हेब्बाळकर यांची कर्नाटकच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *