Monday , September 21 2026
Breaking News

शारदा विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : शहापूर गणेशपूर गल्ली येथील शारदा विद्यालयात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीतून ‘पृथ्वी वाचवा’, ‘प्रदूषणमुक्त पर्यावरण’ आणि ‘हरित भविष्यासाठी वृक्षारोपण’ यांसारखे प्रभावी संदेश साकारले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापनाने कौतुक केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *