Wednesday , November 6 2024
Breaking News

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : दर्शनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; १४ ला निकाल

Spread the love

 

बंगळूर : चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता दर्शनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली आणि १४ ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला.
५७ व्या सीसी न्यायालयाने दर्शनने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि आरोपीचे वकील सी. व्ही. नागेश आणि एसपीपी प्रसन्न कुमार यांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला.
ए २ आरोपी दर्शनला जामीन मिळणार की नाही, हे १४ ऑक्टोबरला कळेल. त्याच दिवशी आरोपी ए १ पवित्रा गौडा, ए ८ रविशंकर, ए ११, ए १२ आणि ए १३ यांचा जामीन अर्जावरील आदेशही त्याच दिवशी बाहेर येणार आहे.
ए १३ दीपकला १४ ऑक्टोबरला जामीन मिळण्याची खात्री आहे. कारण एसपीपीने दीपकला जामीन देण्यास कोणताही आक्षेप घेतलेला नाही. मात्र अन्य कोणत्याही आरोपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद प्रसन्न कुमार यांनी केला.
आजच्या युक्तिवादात सी. व्ही. नागेश यांनी गेल्या दोन दिवसांत एसपीपीने सादर केलेल्या युक्तिवादावर आपला बचाव मांडला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी आणि साक्षीदारांचे ठिकाण एकाच ठिकाणी असल्याचा नागेशने आक्षेप घेतला. त्यानंतर एका साक्षीदाराचे म्हणणे १३ दिवस उशिरा नोंदवले जात असल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला. तसेच तो पुरावा पोलिसांनी तयार केला होता. शवविच्छेदन तपासणी अहवाल आल्यानंतर त्या अहवालाशी तुलना करण्यासाठी साक्षीदाराकडून जबाब घेण्यात आला, असा युक्तिवाद त्यांनी केला.

About Belgaum Varta

Check Also

तीन मुलांना नदीत फेकून पित्याची आत्महत्या

Spread the love  गदग : आपल्या कोवळ्या तीन मुलांना नदीत फेकून पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *