Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

बिम्स हॉस्पिटलकडून चुकीचे प्रमाणपत्र दिल्याची तक्रार

  बेळगाव : आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलीस यंत्रणेला चुकीचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी बिम्स हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची तक्रार बेळगुंदी येथील समिती कार्यकर्ते शटूप्पा चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले आहे. तसेच सदर निवेदन प्रांताधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ; राज्यपालांचा निर्णय उच्च न्यायालयात कायम

  बेंगळुरू : मुडा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशीला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय राज्य उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुडा जमीन वाटप घोटाळाप्रकरणी राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आज आपला निकाल जाहीर केला आणि …

Read More »

“महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” ज्येष्ठ सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर

  बेळगाव : महात्मा गांधी विचार मंच, गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) यांच्या वतीने यंदाचा पहिला “महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” ज्येष्ठ सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी 11 वाजता मराठी विद्यानिकेत येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, …

Read More »

मुडा घोटाळा : उच्च न्यायालयाचा आज निकाल

  मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याचा निर्णय; सर्वांचे उच्च न्यायालयाकडे लक्ष बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून उद्या (ता. २४) उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात, याबाबत तीव्र …

Read More »

रेणुकास्वामी खून प्रकरण : तिघांना जामीन मंजूर; दर्शन, पवित्राच्या अर्जाची सुनावणी लांबणीवर

  बंगळूर : चित्रदुर्गस्थित रेणुका स्वामी खून खटल्यातील ए १ आरोपी पवित्रा गौडा आणि ए २ आरोपी अभिनेता दर्शन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपीना काल जामीन मंजूर करण्यात आला. एसपीपी प्रसन्न कुमार यांनी दर्शन आणि पवित्रा …

Read More »

साखर कारखाना संचालकाच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ बेळगाव- चंदगडवासीय रस्त्यावर!

  बेळगाव : तिलारी धरणाचे पाणी कालव्याने मार्कंडेय नदीला जोडण्याच्या प्रकल्पासंदर्भात चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्यात नुकतीच एक सकारात्मक औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचे सोयीस्कर राजकारण करत चंदगड येथील दौलत साखर कारखान्याचे संचालक मानसिंग खोराटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सीमावासीयांच्या भावना दुखावल्या …

Read More »

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर?

  मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचे सांगितलले …

Read More »

खानापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा २६ सप्टेंबर रोजी संप

  खानापूर : येत्या २६ सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय तालुका ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला असून या पार्श्वभूमीवर खानापूरमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्यांच्या आग्रहास्तव येत्या २६ सप्टेंबर रोजी तालुका केंद्रात कामबंद आंदोलन करून राज्यव्यापी आंदोलन हाती …

Read More »

गोकाक महालक्ष्मी सहकारी बँक घोटाळ्यातील 14 आरोपींची मालमत्ता जप्त : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद

  बेळगाव : गोकाक महालक्ष्मी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 14 आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष जितेंद्र यांनी तक्रार केली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांसह 14 आरोपींनी …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय हँडबॉल व स्पर्धेला रविवार दि. 22 रोजी प्रारंभ झाला या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, संत …

Read More »