Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

तन्मयी पावले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेची बुद्धिबळपटू तन्मयी संभाजी पावले हिने 17 ऑक्टोबर सौंदत्ती मुन्नवळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले असून हासन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक …

Read More »

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही; प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीचे वादग्रस्त वक्तव्य

  मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली असून आता नुकत्याच एका पत्रकार परिषदेत तिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल असे वक्तव्य केलं आहे. गोरखपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेत तो दहशतवादी नसल्याचे म्हटले आहे. ममता …

Read More »

खानापूर तालुक्यात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित

  खानापूर : हेस्कॉमकडून वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे. खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, …

Read More »

राज्यस्तरीय विविध जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉस्टेलच्या जूडो खेळाडूंचे यश

  बेळगाव : गेल्या महिन्यात 7 आणि 8 सप्टेंबर रोजी रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे पार पडलेल्या कर्नाटक राज्य जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉस्टेलचे खेळाडू तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील, धनुष्य एल. यांनी सुवर्णपदके जिंकून उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली …

Read More »

मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचा माहेश्वरी अंधशाळेत अभ्यास दौरा

  बेळगाव : दिनांक 28.10.2025 रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माहेश्वरी अंधशाळेत अभ्यास दौरा होता. तेथील विद्यार्थ्यांचे काम, शिकण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत, त्या विद्यार्थ्यातील शिस्त या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिल्या. अंधत्वावर मात करून शिकण्याची जिद्द मुलांमध्ये असते. याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली. अभ्यासाबरोबरच मुले संगणक, बुद्धिबळ, क्रिकेट हे खेळ खेळतात. …

Read More »

काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार

  बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबर ‘काळा दिन’ गांभीर्याने पाळण्याबाबत आणि त्या निमित्त आयोजित …

Read More »

बेळगावचे प्रख्यात उद्योगपती बाळासाहेब भरमगौडा पाटील यांचे निधन

  बेळगाव : बेळगावातील हिंदवाडी येथील रहिवाशी, दानशूर उद्योजक आणि बी. टी. पाटील (पॅटसन) उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब भरमगौडा पाटील (वय ९३) यांचे आज पहाटे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगावच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्तबगार चिरंजीव सचिन व तुषार, …

Read More »

संघासह सर्व संघटनांच्या उपक्रमांवरील सरकारी निर्बंधांना स्थगिती

  कर्नाटक सरकारला धक्का; संविधानिक अधिकार हिरावता येत नसल्याचा न्यायालयाचा इशारा बंगळूर : सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी कोणत्याही संघटनेच्या उपक्रमांसाठी पोलिस विभागाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य ठरविणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाला धारवाड खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आरएसएसच्या उपक्रमांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना …

Read More »

कार्तिकी एकादशीनिमित्त हुबळी–पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे

  बेळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने विशेष आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी–पंढरपूर या मार्गावर दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावसह खानापूर, लोंढा आणि परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेला स्लीपरसह जनरल डबे जोडण्यात …

Read More »

बिम्स हॉस्पिटलमधून पळून गेलेला कैदी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : आजारपणामुळे बेळगावातील बिम्स हॉस्पिटलमध्ये आणले असता बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेलेल्या पोको प्रकरणातील कैद्याला पुन्हा ताब्यात घेण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे आणल्यानंतर पोको प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अनिल लंबुगोल (रा. मांजरी ता. चिक्कोडी) याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. …

Read More »