Monday , September 21 2026
Breaking News

तन्मयी पावले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेची बुद्धिबळपटू तन्मयी संभाजी पावले हिने 17 ऑक्टोबर सौंदत्ती मुन्नवळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले असून हासन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार व शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील, महेश हगिदळे, प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर, वैभवी दळवी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांचे प्रोत्साहन मिळत आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून शाळेकडून तिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *