Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार, मृतांचा आकडा १४३ वर

  वायनाड : केरळच्या वाडनाड येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने ४ गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजूनही २०० पेक्षा अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरूच …

Read More »

वाढदिवसाचे औचित्य साधून येळ्ळूर ग्रामपंचायतीला पुस्तके भेट

  बेळगाव : येळ्ळूर येथील ग्रामपंचायतीत ग्रंथालयांची स्थापना करून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही होत आहेच शिवाय अनेकांनी आजवर येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील आयोजित उपक्रमांविषयी प्रशंसा व्यक्त केली आहे.. तर येळ्ळूर येथील युनियन बँकचे मॅनेजर अभिजीत सायमोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त …

Read More »

आठवडाभरात मिळणार दोन महिन्याचे वेतन

  उत्तम पाटील यांची अधिकाऱ्यांशी चर्चा; कर्मचाऱ्यांचा संप मागे निपाणी (वार्ता) : शहरात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या पाणीपुरवठा तू भागातील ५० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही वेतन न मिळाल्याने सोमवारी (ता.२९) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी दिवसभर पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी प्रांताधिकारी …

Read More »

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला बेळगाव पोलिसांकडून अटक

  बेळगाव : माळमारुती पोलिसांनी हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथून दयानंद रामू जिनराळ नावाच्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांनी ट्रेनिंग स्कूल उघडून मी बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देईन, असा विश्वास दाखवून प्रसंगी बनावट सीबीआय, ईडी, आयटी अधिकारी बनून कोट्यवधी रुपये गोळा केले. माळमारुती पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याला अटक केली असून …

Read More »

हालात्री नदी पुलावरून वाहून जाणारा बचावला!

  खानापूर : गोव्याहून हेमाडगा मार्गे खानापूरकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना बेळगाव शहापूर येथील व्यक्ती विनायक जाधव या व्यक्तीने मणतूर्गा जवळील हालात्री नदीवरील पुलावर दुचाकी घातल्याने दुचाकीसह वाहून जात असताना नदीकाठावरील झुडुपातील फांदी पकडून धरली आणि आरडाओरडा करू लागला. याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता खानापूर येथील अग्निशामक दलाची गाडी व …

Read More »

बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड

  उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची निवड लॉटरीद्वारे बेळगाव : बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची लॉटरीद्वारे निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अशोक सुरुर यांनी काम पाहिले. दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी सोमवारी (दि. २९) निवडणूक पार पडली. अध्यक्षपद अनुसुचित जाती-जमाती महिलेसाठी तर …

Read More »

भारताच्या खात्यात दुसरे पदक, नेमबाजीत मनू भाकेर, सरबजोत सिंह जोडीची कमाल

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि …

Read More »

घटप्रभा नदीला पूर; मेळवंकी संपूर्ण गाव पाण्याखाली

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 7 नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोकाक तालुक्यातील संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असून अनेक कुटूंबे रस्त्यावर आली आहेत. घटप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे गोकाक तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली असून मेळवंकी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. 800 घरे …

Read More »

बिजगर्णी ग्राम पंचायत अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी ऍड. नामदेव मोरे यांची बिनविरोध निवड

  बेळगाव : बिजगर्णी ग्राम पंचायत अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी ऍड. नामदेव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रा. पं. कार्यालयात निवड प्रक्रिया झाली. दोन्ही पदांसाठी एकेक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. दुसऱ्या टप्यातील निवडणूक प्रक्रियेंतर्गत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी तर उपाध्यक्षपद सामान्य प्रवर्गासाठी होते. अध्यक्षपदासाठी एकमेव महिला सदस्या …

Read More »

वायनाडमध्ये भूस्खलन; १९ जणांचा मृत्यू

  वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत २ लहान मुलांसहित १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे ४.१० वाजता …

Read More »