Sunday , July 26 2026
Breaking News

बिजगर्णी ग्राम पंचायत अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी ऍड. नामदेव मोरे यांची बिनविरोध निवड

Spread the love

 

बेळगाव : बिजगर्णी ग्राम पंचायत अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी ऍड. नामदेव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रा. पं. कार्यालयात निवड प्रक्रिया झाली. दोन्ही पदांसाठी एकेक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.

दुसऱ्या टप्यातील निवडणूक प्रक्रियेंतर्गत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी तर उपाध्यक्षपद सामान्य प्रवर्गासाठी होते. अध्यक्षपदासाठी एकमेव महिला सदस्या पात्र होत्या. यासाठी नाईक यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपद खुले असल्याने इच्छूक अधिक होते. परंतु, ऍड. मोरे यांचा एकमेव अर्ज
दाखल करण्यात आला. दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ग्रा. पं. मध्ये १४ सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्य उपस्थित होते.

निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर, युवराज कदम, यल्लाप्पा बेळगावकर, निंगाप्पा जाधव आदींसह ग्रा. पं. सदस्य महेश पाटील, संतोष कांबळे, मंगल जाधव, लक्ष्मी पाटील, शितल तारिहाळकर, मनीषा सुतार, मंजुळा कांबळे, गायत्री सुतार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *