Saturday , June 6 2026
Breaking News

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला बेळगाव पोलिसांकडून अटक

Spread the love

 

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथून दयानंद रामू जिनराळ नावाच्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांनी ट्रेनिंग स्कूल उघडून मी बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देईन, असा विश्वास दाखवून प्रसंगी बनावट सीबीआय, ईडी, आयटी अधिकारी बनून कोट्यवधी रुपये गोळा केले. माळमारुती पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याला अटक केली असून त्याची रवानगी कारागृहात धाडले. आरोपीला बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि डीसीपी स्नेहा पीव्ही यांनी माळमारुती सीपीआय जे एम कालीमिर्ची आणि टीमचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *