Sunday , July 26 2026
Breaking News

बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड

Spread the love

 

उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची निवड लॉटरीद्वारे

बेळगाव : बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची लॉटरीद्वारे निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अशोक सुरुर यांनी काम पाहिले.
दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी सोमवारी (दि. २९) निवडणूक पार पडली. अध्यक्षपद अनुसुचित जाती-जमाती महिलेसाठी तर उपाध्यक्षपद सामान्य प्रवर्गासाठी होते. अध्यक्षपदासाठी महादेवी मेदार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यपदासाठी बाबुराव यांच्यासह विठ्ठल पाटील यांनी अर्ज भरला होता. मात्र, दोघांनाही समान पाच मते मिळाली. तर एक मत बाद झाले. त्यामुळे लॉटरी पद्धतीने उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यात बाबुराव यांनी बाजी मारली.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, भुजंग गाडेकर, रामू पाटील, नारायण गोडसे, विठ्ठल मजुकर, एन. के. नलवडे, कल्लाप्पा पाटील, नारायण पाटील, गोपाळ पाटील, सातेरी पाटील, पितांबर पाटील, नामदेव पाटील, प्रकाश सुतार, मारूती गुरव, मनोहर पाटील, मनोहर होसुरकर, कल्लाप्पा सुतार, म्हाळू होसुरकर, फकिराप्पा मेदार, ग्राम पंचायत अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *