Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

के. पी. मग्गेण्णावर इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी व मोहरम साजरा

  मांजरी : मुलांना अभ्यासाबरोबर आपली संस्कृती आणि परंपरा समजावी या उद्देशाने जय जिनेन्द्र शिक्षण संस्थेच्या श्री. के. पी. मग्गेण्णावर इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी व मोहरम या सणाचे औचित्य साधून आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शितलकुमार मग्गेण्णावर हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अंकुश …

Read More »

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा हायस्कूल येथे वाढदिवसानिमित्त वह्या वाटप करण्यात आल्या. विधी विना गती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शुभ्र खचले इतके सारे अनर्थ एका अविज्ञेने केले आहे. आपल्याला ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला …

Read More »

पंढरपूर येथे बेळगावच्या तरुणाचे निधन

  बेळगाव : वडगाव सोनार गल्लीमधील एका तरुणाचे पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सदर घटना बुधवारी (दि. १७) सकाळी दहा वाजता घडली. प्रवीण सुतार असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, प्रवीण वडगाव परिसरातील वारकऱ्यांना घेऊन आपल्या वाहनातून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपून …

Read More »

कडोलीतील अमानुष घटनेने गावात तणावाचे वातावरण; चोख पोलिस बंदोबस्त

  स्वीय सहायक मलगौडा पाटील यांनी केली पीडित कुटुंबियांची विचारपूस बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कडोली गावातील आझाद गल्ली येथील समीर अब्बास धामणेकर (30) याला पोलिसांच्या …

Read More »

गडचिरोलीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान, एक पीएसआय जखमी

  गडचिरोली : जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांत चकमक उडाली. यात १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. एक पोलीस उपनिरीक्षक जखमी आहे. अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व …

Read More »

दिंडीमध्ये वारकरी महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुप्पटगिरी येथील घटना

  खानापूर : आषाढी एकादशीनिमित्त गावकऱ्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना वारकरी महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथे बुधवारी घडली आहे. यल्लू उर्फ बायजा यशवंत पाटील (वय 72) असे या वारकरी महिलेचे नाव आहे. गावातील वारकरी मंडळींच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती. या …

Read More »

मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

  आरोपी बेळगाव : मतिमंद तरुणीवर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळगावच्या काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आई -वडील शेताकडे गेल्याचा फायदा घेऊन एका नराधम तरुणाने एका मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कडोली येथे घडली. दरम्यान त्या मुलीच्या …

Read More »

एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये मराठा सेंटरच्या कुस्तीपटूंचे यश

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या विश्वजित मोरे आणि धनराज जमनिक या कुस्तीपटूनी एशियन कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये आपली चमक दाखवली. हे दोघेही कुस्तीपटू मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. विश्वजित मोरे याने तेवीस वर्षाखालील गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले. ही स्पर्धा …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूल येळ्ळूर येथे आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन

  बेळगाव : येळ्ळूर येथे दि. 16 जुलै आषाढी एकादशी निमित्त श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूलच्या वतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून दिंडीची सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, पुंडलिक, माऊली अशा विविध वेशभूषेत गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टाळ मृदंगाच्या साथीने …

Read More »

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

  बेळगाव : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे संस्थापक व जायंट्स मेन स्पेशल कमिटीचे सदस्य मोहन कारेकर यांनी ७० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या मित्रांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मंगळवार दि. १६ रोजी कारेकर यांच्या विनायकनगर येथील निवासस्थानी सर्व मित्रांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये प्रामुख्याने सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडीट …

Read More »