Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; लोंढा परिसरातील घटना

  लोंढा : शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर तीन अस्वलानी पाठीमागून हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याने धाडसाने दगड मारून अस्वलाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. लोंढा येथे सदर घटना घडली. दगडाने मारल्यामुळे तीन अस्वले शेतकऱ्याला सोडून पळून गेली. सकाळी नेहमी प्रमाणे प्रभू शिनुटगेकर हे आपल्या शेताकडे निघाले …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची बेळगाव येथे भेट घेतली. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबतचे निवेदन सादर केले. राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कर्नाटक राज्य रयत …

Read More »

मागासवर्गीय समाजातील युवकांनी उद्योजक व्हावे

  पालकमंत्री सतीश जारकीहोळी; बोरगाव ओमगणेश टेक्स्टाईलला भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारकडून मागासवर्गीय समाजासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. अल्प व्याजदरात व मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याचा दलित व मागासवर्गीय समाजातील युवकांनी लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी …

Read More »

गर्भलिंग तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलवर धाड

  बेळगाव : पीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी करणाऱ्या मूडलगी येथील हॉस्पिटलवर राज्य आरोग्य विभाग प्राधिकरण आणि राज्य तपासणी आणि देखरेख समितीने छापा टाकला. मूडलगी येथील इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. कुतेझुल्ला कुब्रा हे गर्भ लिंग तपासणी करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तसेच …

Read More »

सीमाप्रश्नी संसदेत आवाज उठवावा; खासदार शाहू महाराज यांना निपाणी विभाग समितीच्यावतीने विनंती

  निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे नु पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली. श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, त्यानंतर सीमाप्रश्नी आपण संसदेत मुद्दा उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून सीमाभागाधील 865 …

Read More »

डिजिटल न्यूज असोसिएशन सदस्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बेळगावातील डिजिटल न्यूज असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या समवेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. डिजिटल न्यूज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना डिजिटल पत्रकारीते संदर्भात आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांबाबत विवेचन केले. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्याच्या युगात डिजिटल न्यूजने नवी क्रांती घडविली …

Read More »

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न

  मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी कोल्हापूर : नृसिंहवाडी दत्त मंदिरात मंदिराच्या गाभाऱ्यात पहाटे 4 वाजता पाणी गेलं आणि दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोल्हापुरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. कृष्णा नदीतील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. …

Read More »

म. फुले भाजी मार्केट (झेंडा चौक) व्यापाऱ्यांनी घेतली स्थायी समिती अध्यक्षांची भेट

  बेळगाव : येथील म. फुले भाजी मार्केटबाबतची माहिती सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महापालिकेला दिली असून, महापालिकेकडून भाजी मार्केटची माहिती तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात म. फुले भाजी मार्केट (झेंडा चौक) येथील व्यापारी सोमवारी (ता. १५) आयुक्तांची भेट घेण्यास गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. यामुळे …

Read More »

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

  जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत. डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडाच्या उत्तर …

Read More »

पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू

  नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »