Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

धामणे येथे घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आग

  बेळगाव : एकीकडे शहरात दिवसाढवळ्या वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे धामणे गावात मात्र कुलूपबंद वाहनांना आग लावून पळ काढल्याच्या घटना समोर येत आहेत. काल रात्री काही अज्ञातांनी आपल्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना आग लावून पलायन केले आहे. धामणे गावात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे …

Read More »

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

  खानापूर : आज शुक्रवार दिनांक ५ जुलै २०२४ रोजी खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूर तालुक्यातील करंबळ, जळगे, जळगेहट्टी, चापगाव, वड्डेबैल, अल्लेहोळ, शीवोली,का, हेब्बाळहट्टी, लालवाडी, कौंदल, झाडनावगे, हेब्बाळ,जे.सी.एच. शाळा नंदगड व संत मेलगे शाळा नंदगड, कसबा नंदगड, भत्तीवडे या …

Read More »

अनुसूचित जाती, जमातीचे अनुदान संबंधित वर्षातच खर्च व्हावे : मुख्यमंत्र्यांचा इशारा

  अनुसूचित जाती, जमाती राज्य विकास परिषदेची बैठक बंगळूर : एससीएसपी आणि टीएसपी अंतर्गत अनुदान संबंधित वर्षातच खर्च केले जावे. या कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती राज्य विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी वाटप …

Read More »

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध : काँग्रेस नेते महादेव कोळी

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध आहेत. भारतीय जनता पार्टीसारखे गलिच्छ राजकारण काँग्रेस पक्ष कधीच करत नाही. आम्ही नेहमी सत्याच्याच बाजूने असतो, असे काँग्रेस नेते महादेव कोळी म्हणाले. कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना तालुक्याच्या आमदार म्हणून डॉ. अंजलीताई निंबाळकर या विकास कामे राबवीत …

Read More »

बेळगावात ८ जुलै रोजी पंचमसाली आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन : पंचमसाली स्वामीजी

  बेळगाव : पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देण्यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी पंचमसाली समाजाच्या सर्व आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडलसंगम पंचमसाली गुरुपीठाचे अध्यक्ष श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली. आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण मिळावे …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी मुडाचे भूखंड वाटप केले रद्द

  सीबीआय चौकशी फेटाळली; मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी म्हैसूर शहर विकास प्रधिकरण (मुडा) द्वारे ४,००० कोटी रुपयांच्या जमीन-वाटप घोटाळ्यातील भाजपच्या घराणेशाही आणि अनियमिततेच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून पर्यायी जागेचे वाटप स्थगित केले. दरम्यान, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस मुख्यमंत्र्यांनी नकार दिला असून राजीनामा देण्याची मागिीही …

Read More »

हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा

  येडियुरप्पांचे काँग्रेसला आव्हान; भाजप राज्य कार्यकारिणीची विशेष बैठक बंगळूर : मे २०२३ मध्ये राज्यात प्रचंड बहूमतासह सत्तेवर आलेल्या सत्ताधारी काँग्रेसने एका वर्षाच्या अल्प कालावधीत लोकप्रियता गमावली असल्याचा दावा करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विधानसभा विसर्जित करून नव्याने जनादेश मागण्याचे आव्हान दिले. “मी तुम्हाला …

Read More »

महाद्वार रोड क्रॉस नंबर चार समस्यांच्या विळख्यात

  बेळगाव : महाद्वार रोड क्रॉस नंबर चार समस्यांच्या विळख्यात सापडला असून वारंवार मागणी करून देखील संबंधित नगरसेवकांचे व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. महाद्वार रोड येथील क्रॉस नंबर चार मधील गटारी मागील दोन वर्षांपासून तुंबलेल्या अवस्थेत आहेत. विद्यमान नगरसेविकेला वारंवार सांगून देखील गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या …

Read More »

कर्नाटक राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून

  बंगळूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून होणार आहे. १५ ते २६ जुलै या कालावधीत नऊ दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन असेल. विधानसभेचे सचिव एम. के. विशालाक्षी यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, राज्यपालांनी १५ जुलैला सकाळी ११ वाजता अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत. २६ जुलैनंतर अधिवेशनाची मुदतवाढ घ्यायची की संपवायचे …

Read More »

बेळगावचे नवे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी दि. ५ जुलै रोजी बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते मोहम्मद रोशन यांनी पदभार स्विकारला. आयएएसच्या २०१५ बॅचचे मोहम्मद रोशन यांनी यापूर्वी हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य केले आहे. बी.टेक आणि एमबीए (वित्त), एमए (पब्लिक पॉलिसी) …

Read More »