Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

निपाणी परिसरात शेतकरी बांधवातर्फे भूमी पौर्णिमा उत्सव साजरा

  निपाणी (वार्ता) : दसऱ्यानंतर शेतकरी बांधव भूमिपूजनाचा उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजल्यापासूनच या कार्यक्रमाची शेतकऱ्याकडून तयारी सुरू झाली होती. वर्षभर अन्न पुरवणाऱ्या भूमी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. आधुनिकतेच्या युगातही शेतकरी अजूनही त्यांच्या शेतांवर अवलंबून आहेत. भूमी पूजन म्हणजे अन्न …

Read More »

रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड

  बेळगाव : पिढ्यानपिढ्या मातीशी घट्ट नात असलेल्या शेतकऱ्यांच्या रयत गल्लीतील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने, सुंदर, लक्ष वेधून घेणारा साकारला दुर्ग भरत गड. दसरा संपला की बेळगाव परिसरातील विद्यार्थी तसेच युवकांना छत्रपती शिवरायांच्या काळातील दुर्ग तसेच किल्ले बनवण्यासाठी लगभग लागते. त्यामागे एक शास्रीय कारणही आहे. कारण उन्हात तापलेल्या मातीत जर पाणी पडले …

Read More »

सार्वजनिक वाचनालयात कवी संमेलन संपन्न, उद्या शिक्षकांचे चर्चासत्र

  बेळगाव : “कविता हा वाङ्मयातील सर्वात अवघड प्रकार आहे. कविता लिहिणे ही तपस्या आहे. कविता शब्दांमध्ये मांडणे फार कठीण असते, सतत वेगळेपण शोधणे हे कवीचे काम असते. आज येथे अनेक कवींनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या.”असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …

Read More »

पंत बाळेकुंद्री महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ…

  बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवारी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ८ वाजता समादेवी गल्लीतील पंतवाड्यातून प्रेमध्वज मिरवणूकीला प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी पंथ महाराजांचे वंशज परमपूज्य रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराजांच्या …

Read More »

पत्नीची हत्या करून मृतदेह पलंगाखाली लपवून पतीचे पलायन!

  बेळगाव : तीन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमलादिनी येथे एका पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवून आणि मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी आकाश कुंभार (२०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी आकाशशी लग्न करणाऱ्या साक्षीला हुंडा आणण्यासाठी …

Read More »

ऊस दरासाठी रयत संघाचे हारूगिरीत शुक्रवारी आंदोलन

  बेळगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात यावा असा आदेश सरकारने जारी केला असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा दर 5500 रुपये इतका घोषित करावा, या मागणीसाठी येत्या शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी हारुगिरी क्रॉस येथे कर्नाटक राज्य रयत संघ आणि …

Read More »

दिवाळीच्या तोंडावर ‘सोने’ महागले; २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर तब्बल रू १,२५,०००

  सर्वसामान्यांना फटका : लग्नसराईत बजेट कोलमडणारं बेळगाव (प्रतिनिधी) : महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. साधारणपणे १७ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होईल आणि या काळात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र …

Read More »

पाकाळणी कार्यक्रमाने बाबा महाराज समाधीस अभिषेक घालून निपाणी उरुसाची सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री. महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब(क. स्व) यांचा उरूस उत्सव शांततेत पार पडला. बुधवारी (ता.८) चव्हाण वाड्यातून चव्हाण वारस श्रीमंत रणजित देसाई -सरकार, श्रीमंत संग्राम देसाई -सरकार, श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह आणि बाहेरील …

Read More »

सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध

  खानापूर : सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भात खानापूर तहसीलदारांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय श्री. बी. आर. गवई यांच्या दिशेने पायातील जोडे …

Read More »

समर्थ नगर येथे महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

  बेळगाव : समर्थ नगर परिसरात आज सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सदर महिला घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता विहिरीजवळ चप्पल आढळल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी या घटनेची माहिती …

Read More »