Monday , September 21 2026
Breaking News

पाकाळणी कार्यक्रमाने बाबा महाराज समाधीस अभिषेक घालून निपाणी उरुसाची सांगता

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री. महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब(क. स्व) यांचा उरूस उत्सव शांततेत पार पडला. बुधवारी (ता.८) चव्हाण वाड्यातून चव्हाण वारस श्रीमंत रणजित देसाई -सरकार, श्रीमंत संग्राम देसाई -सरकार, श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह आणि बाहेरील संत बाबा महाराज चव्हाण समाधी अभिषेक घालून पाकाळणी प्रमाणे गोडानैवेद्य दाखवून उरुसाची सांगता करण्यात आली.
सकाळी दहा वाजता जिजामाता चौकातील संत बाबा महाराज चव्हाण समाधी स्थळापासून मानक-यासह सवाद्य मिरवणुकीने गोडा नैवेद्य घेऊन प्रथमता हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांच्या दर्गामध्ये पाकाळणी करण्यात आली. त्यानंतर अभिषेक घालून नैवेद्य दाखवण्यात आला. तेथून विद्यामंदिर शाळे मार्गे बाहेरील संत बाबा महाराज चव्हाण यांच्या समाधीस्थळावर मानकरी दाखल झाले. तेथे चव्हाण वारसांच्या हस्ते अभिषेक घालून आरती नंतर नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, उपाध्यक्ष संजय माने, विवेक मोकाशी, योगेश शहा, शरद मळगे, सागर हरेल, सदाशिव डवरी मच्छिंद्र डवरी, गुरू पोवार, बंडा गंथडे व, दत्ता रावळ, प्रदीप रावळ, दत्ता किणेकर, दिलीप रवाळ, राजू लाड, प्रभाकर पाटील, जयराम मिरजकर, ओंकार येरुडकर, सुजित गायकवाड, समीर मुजावर, जहिद मुजावर, संभाजी मुगळे, आतिश शिंदे, विश्वास माळी यांच्यासह साळी समाज व भाविक उपस्थित होते. महाप्रसादाने उरूसाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *