Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

समाजसेविका माधुरी जाधव यांच्यातर्फे काडा अध्यक्ष युवराज कदम यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे नेते युवराज कदम यांची नुकतीच काडाच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील), श्वेता खांडेकर, मनोहर बेळगावकर, पद्मराज, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

Read More »

मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण; तातडीच्या उपाययोजनांचे दिले निर्देश

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी गुलबर्गा, बिदर, यादगिरी आणि विजयपुर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. मंत्री एम. बी. पाटील, कृष्णा बैरेगौडा आणि प्रियांक खर्गे यांच्यासमवेत, मुख्यमंत्र्यांनी गुलबर्ग्यामध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे आणि महाराष्ट्रातील उजनी तसेच नीरा जलाशयांमधून जास्त पाणी सोडल्यामुळे भीमा नदी खोऱ्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. …

Read More »

बेळगाव गोल्फ असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड

  बेळगाव : बेळगाव गोल्फ असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते नुकताच देसूर येथील बीजीए क्लबमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. एन. जे. शिवकुमार यांची पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी सलग पाच कार्यकाळ कॅप्टन म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. निवडलेले पदाधिकारी : अध्यक्ष : एन. जे. …

Read More »

खानापूर उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांचे निधन

  खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक आणि मनमिळाऊ अधिकारी उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ३० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे बेळगाव तालुक्यातील कडोली येथील रहिवासी असलेले कल्लाप्पा कोलकार हे गेली आठ ते दहा वर्षे खानापूर तहसीलदार कार्यालयात उप तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात …

Read More »

पडत्या पावसातही कलावंताकडून रांगोळी सादर

  कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर शहराची सर्वात श्रीमंत गल्ली म्हणून गुजरीची ओळख. या गल्लीत नगरप्रदक्षिणा मार्गावर आज न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. गुजरीच्या या गल्लीत पडत्या पावसाच्या शिडकाव्याचा मारा सहन करत रांगोळी कलावंतांचा उत्साह शिगेला …

Read More »

दुर्गादेवी जत्तीमठ येथे माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते आरती संपन्न…

  बेळगाव : दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ बेळगाव येथे नवरात्री उत्सव सोहळा उत्साहात खंडेअष्टमीच्या दिवशी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर देवीची ओटी भरून दर्शन घेतले तसेच आज देवीची आरती सुद्धा ताईंच्या हस्ते करण्यात आली. विशेष म्हणजे गोंधळ लोककलेच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने लोकसंस्कृती जपणारे वाद्यांच्या गजरात वेगवेगळी गीते …

Read More »

संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर

  बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी जेष्ठ नागरिक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक आणि समाजाला आदर्श असणाऱ्या क्रियाशील व्यक्तीमत्वांना संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी संगीत गुरू शंकर पाटील, नाट्य दिग्दर्शिका सुनिता पाटणकर आणि समाजसेविका कवियत्री स्मिता पाटील यांना …

Read More »

“जय किसान”च्या व्यापाऱ्यांसाठी एपीएमसीमध्ये जागा उपलब्ध करून देणार

  बेळगाव : सरकारी नियमानुसार ‘जय किसान’ सारख्या खाजगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी देण्याची सरकार प्रणालीत कोणतीही तरतूद नाही. मात्र, ‘जय किसान’च्या सर्व व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगाव शहरात आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

नवरात्रोत्सवानिमित्त निपाणीत विविध मंडळातर्फे गरबा दांडियाचा जल्लोष

  निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहरात दांडिया-गरब्याचा जल्लोष रंगात सुरू आहे. तरुणाई उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे. शहरातील प्रमुख मंडळे व क्लबतर्फे आकर्षक मंडप, रोषणाई व सजावट करून दांडिया, गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात गरबा, दांडियाची रंगत वाढत आहे. या विविध समाजातील तरुणाई …

Read More »

सततच्या पावसाने झेंडूचा झाला खराटा

  फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यातून फुलशेती करणारे शेतकरीही सुटलेले नाहीत. चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेवंती, गुलाब, झेंडूच्या झाडांचा दसऱ्यापूर्वीच खराटा झाला आहे. दसरा, दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा झेंडू अतिवृष्टीने आडवा झाला आहे. त्यामुळे …

Read More »