Sunday , July 26 2026
Breaking News

दुर्गादेवी जत्तीमठ येथे माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते आरती संपन्न…

Spread the love

 

बेळगाव : दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ बेळगाव येथे नवरात्री उत्सव सोहळा उत्साहात खंडेअष्टमीच्या दिवशी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर देवीची ओटी भरून दर्शन घेतले तसेच आज देवीची आरती सुद्धा ताईंच्या हस्ते करण्यात आली.

विशेष म्हणजे गोंधळ लोककलेच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने लोकसंस्कृती जपणारे वाद्यांच्या गजरात वेगवेगळी गीते सादर करण्यात आली. गोंधळाच्या विविध पद्धती रितीरिवाज करून पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. अंजलीताईंचा हार घालून सत्कार केला.

यावेळी मंदिराचे ट्रस्टी सरपंच दत्ता जाधव, मदन बामणे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, किरण जाधव, चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. निलेश शिंदे, माजी नगरसेवक अनिल पाटील, माजी नगरसेवक ऍड. अमर येळ्ळूरकर, मोतेश बरदेशकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी उपमहापौर मधुश्री पूजारी, महादेव पाटील, सुनील बोकडे, शिवानी पाटील, तसेच भाविक भक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *