Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत केएलई जी. आय. बागेवाडी कॉलेजचे यश

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकाविले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. येथील श्री व्यंकटेश पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये झालेल्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये मुलांच्या गटात विवेक माने याने भालाफेक …

Read More »

जोहान्सबर्गमध्ये इमारतीला भीषण आग; ५२ जणांचा मृत्यू

  जोहान्सबर्गमध्ये : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीला आज गुरुवारी पहाटे आग लागली. अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले. या अग्नितांडवात आतापर्यंत ५२ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहे. अग्निशामक दलाने आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे. …

Read More »

निपाणी परिसरात विद्युत मोटारींची चोरी

  एकाच रात्री पाच मोटारींची चोरी : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : निपाणीसह जत्राट आणि परिसरातील वेदगंगा गंगा नदीवरील पाण्याच्या मोटरी चोरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्याभरापूर्वी तीन मोटरीची चोरी झाली होती. तर दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घालून नदीवरील पाणी उपसा करणाऱ्या पाच विद्युत मोटारीची चोरी केल्याची घटना …

Read More »

शिवबसव नगर येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

  बेळगाव : बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथील स्पंदन हॉस्पिटल जवळ बुधवारी रात्री एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय 30 रा. रामनगर वड्डरवाडी) असे मृताचे नाव आहे. घटनस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार युवकाचा हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि दगडाने ठेचून त्याचा खून करून पसार झाले. घटनास्थळी …

Read More »

कर्नाटकातील हमी योजना देशासाठी आदर्श : राहूल गांधी

  गृहलक्ष्मी योजनेला म्हैसूरातून चालना बंगळूर : कर्नाटक सरकारने लागू केलेल्या पाच हमी योजनांचे मॉडेल आगामी काळात काँग्रेस देशभरात राबविणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांनी सांगितले. म्हैसूरमध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन …

Read More »

खानापूरात गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ

  खानापूर : राज्यात काँग्रेसचे सरकार येताच पाच हमी योजनाचा शुभारंभ करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी दि. ३० रोजी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायत, नगरपंचाय आदी कार्यालयात आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने रेल्वे स्टेशन रोडवरील समुदाय भवनात …

Read More »

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करा

  तालुका म. ए. समितीचे मुख्यमंत्री, पालकमंत्र्याना तहसीलदाराव्दारे निवेदन खानापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सुरूवातीला पाऊसच झाला नाही. सध्या तर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भात पिके, उस पिके पावसाविना वाळत चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री यांनी खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर …

Read More »

निपाणीत उद्या मोफत नेत्र, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.१) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू प्रक्रिया तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …

Read More »

बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव येथे राखी प्रदर्शनाचे आयोजन

  बेळगाव : टीएफ सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलींनी आज आपल्या स्वहस्ते बनवलेल्या राखींचे प्रदर्शन केले. यावेळी मुलींनी बनवलेल्या निरनिराळ्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन शाळेतील सौ. संगीता देसाई हॉलमध्ये पार पडले. या वेळेला या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. मोडक आणि सौ. मृदुला पाटील …

Read More »

दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांची अचानक भेट; कागदपत्रांची पडताळणी

  बेळगाव : बेळगाव लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा यांनी दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. उपनोंदणी कार्यालयात मध्यस्थांचा हस्तक्षेप होत असल्याच्या जनतेच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी हनुमंतरायप्पा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकण्यात आला. कार्यालयावर छापे टाकून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. लोकायुक्तांच्या धाडीमुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले …

Read More »