Monday , September 21 2026
Breaking News

निपाणीत उद्या मोफत नेत्र, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.१) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू प्रक्रिया तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल, (रोटरी ब्लड बँक) येथे होणार आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी संबंधी आजारावर मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार असल्याचे के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ वीरू तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर होनवाडे, के.एल.ई.एस. रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष दिलीप पठाडे व रोटरी सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *