Monday , May 25 2026
Breaking News

बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव येथे राखी प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : टीएफ सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलींनी आज आपल्या स्वहस्ते बनवलेल्या राखींचे प्रदर्शन केले. यावेळी मुलींनी बनवलेल्या निरनिराळ्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन शाळेतील सौ. संगीता देसाई हॉलमध्ये पार पडले. या वेळेला या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. मोडक आणि सौ. मृदुला पाटील यांनी केले. शाळेतील इको क्लब आणि हस्तकला यांच्यामार्फत आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला शाळेतील सर्व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मुलींनी राख्यांची खरेदी सुद्धा केली. या प्रदर्शनाला संचालक मंडळातील माधुरी शानभाग, आनंद गाडगीळ यांनी भेट देऊन मुलींनी बनवलेल्या राख्यांचे कौतुक केले. यामध्ये सहावी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन गट करून प्रत्येक गटातील तीन क्रमांक काढून त्या विद्यार्थिनींना रोख बक्षीसे शाळेमार्फत देण्यात आली. हे राखी प्रदर्शन भरवण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी शाळेतील क्राफ्ट शिक्षिका कविता चौगुले, सुजाता देसाई आणि इको क्लब मार्फत अश्विनकुमार पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनाला शाळेतील सर्व शिक्षकांचे तसेच प्राथमिक मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळी आणि माध्यमिक मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी यांचे प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : रास्त भाव धान्य दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात अडथळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *