Monday , May 25 2026
Breaking News

दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांची अचानक भेट; कागदपत्रांची पडताळणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा यांनी दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली.
उपनोंदणी कार्यालयात मध्यस्थांचा हस्तक्षेप होत असल्याच्या जनतेच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी हनुमंतरायप्पा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकण्यात आला. कार्यालयावर छापे टाकून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. लोकायुक्तांच्या धाडीमुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले पाहायला मिळाले. लोकायुक्तांनी कागदपत्रांची चौकशी सुरू करतात उपनोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
बेळगाव दक्षिण विभागातील नोंदणी मुद्रांक विभागात मध्यस्थांचा वाढता हस्तक्षेप होत होता. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारींची दखल घेत बेळगाव लोकायुक्त अधिकारी निरंजन पाटील व लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा यांनी बुधवारी सकाळी सदर कार्यालयाला अचानक भेट दिली. कार्यालयातील कामकाजाची चौकशी करत कागदपत्रांची पडताळणी करताच उपनोंदणी अधिकारी व तेथील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी विचारलेल्या कागदपत्रांची पूर्तता करता करता अधिकाऱ्यांचे तारांबळ उडाली होती. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेनामी मालमत्ता खरेदी जनतेच्या विविध तक्रारी आदीसंदर्भात उपनोंदणी अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांना धारेवर धरले. तसेच जागेच्या मूळ मालकाची खरी माहिती मिळवूनच खरेदी नोंद करावी. जनतेच्या तक्रारीचे तात्काळ निवारण केले जावे, अशा सूचना यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना केल्या.
लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, निरीक्षक आवटी यांनी लोकायुक्त कार्यालयावर अचानक छापा टाकल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : रास्त भाव धान्य दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात अडथळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *