Sunday , September 8 2024
Breaking News

कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आरटी -पीसीआर अनिवार्य

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात रस्ते अथवा रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह आरटी -पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र याची गरज नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांनी अथवा रेल्वेने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह आरटी -पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही अट लागू नसणार आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात कोणतीही ई-पास पद्धत नाही. तथापि कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रातील कांही जिल्ह्यांमध्ये ई-पासची गरज भासण्याची शक्यता आहे. कर्नाटकात मात्र त्याची आवश्यकता नाही. कर्नाटकातून गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी निगेटिव्ह आरटी -पीसीआर प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे, तर गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी कोणताही एसओपी नसणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *