बेंगळुरू : कोरोना लॉकडाऊनच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेत आता दुसरे ओझे उचलायची ताकद राहिलेली नाही. त्यामुळेच राज्यात बस तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सध्या सरकार बस तिकीट दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले. गरीब व जनसामान्यच सरकारी बसमधून प्रवास करतात. कोरोना व लॉकडाऊनच्या ओझ्याखाली हे लोक आधीच दबले आहेत. तशातच बस तिकीट दरात वाढ करून त्यासारख्या अडचणीत भर घालण्याची सरकारची इच्छा नाही. त्यामुळे बीएमटीसी, केएसआरटीसी बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार नाही असे उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.
एकंदर लॉकडाऊन उठवल्यानंतर बस तिकीट दरात वाढ केल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीनेच सरकारने तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Check Also
विश्वविख्यात म्हैसूर दसरा महोत्सवाची आज जंबो सवारीने सांगता
Spread the love बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक जंबोसावरी मिरवणुकीला आज (१२ ऑगस्ट) …