
बेंगळुरू : माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
बंगळूरच्या नारायण हृदयालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचे निधन झाले. हावेरी जिल्ह्यातील हनगल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. हावेरीचे खासदार शिवकुमार उदासी हे त्यांचे पुत्र होत.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.