Monday , December 4 2023

 कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा निपाणीत बुडून मृत्यू

Spread the love

100 फूट खोलीतून काढला मृतदेह : कोल्हापूरच्या जीवरक्षकाला पाचारण

निपाणी (संजय सूर्यवंशी) : मामाच्या गावी निपाणी येथे आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.8) सकाळी उघडकीस आली. रणवीर दिपक सूर्यवंशी (वय 15 रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. गेल्या महिन्यापूर्वी रणवीर हा आपले मामा सुभाष चव्हाण (साळुखे गल्ली, निपाणी) यांच्या घरी आला होता. मंगळवारी (ता.8) सकाळी तो आणि सुभाष यांचा मुलगा प्रथमेश यांच्यासमवेत घरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीमंत निपाणकर – सरकार वाड्यातील विहिर (कुंडामध्ये) पोहण्यासाठी गेले होते. यावेळी प्रथमेश व रणवीर हे दोघे जण इनरच्या साह्याने पोहू लागले. यावेळी घाबरून प्रथमेशने घराकडे धाव घेत याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानुसार घटनास्थळी तातडीने चव्हाण परिवारांसह नगराध्यक्ष जयवंत भाटले, श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील शेलार यांच्यासह काही नगरसेवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी रणवीर हा पाण्यात खोल बुडाल्याचे लक्षात आले. त्यानुसार याची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली. यावेळी घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्यासह हवलदार बसवराज नावी, एस. एस. चिकोडी, संदीप गाडीवड्डर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रणवीर हा खोलवर बुडाल्याचे लक्षात आले. त्यानुसार कोल्हापूर येथील जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. दुपारी कांबळे यांनी सुमारे शंभर फूट खोल विहिरीत बुडालेला रणवीर याचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी मयत रणवीर यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दुपारी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

ऊसासह सोयाबीन, कापसाला योग्य दर द्या

Spread the love  रयत संघटनेची मागणी : खांद्यावर नांगर घेऊन विधानसौधपर्यंत पदयात्रा निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *