Thursday , May 30 2024
Breaking News

राज्यात विकेंड कर्फ्यू रद्द

Spread the love

अनलॉक-3 सोमवारपासून जारी : मंदिर, बार, मॉल सुरू
बंगळूरू : कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत कमी होत असल्याने सरकारने शनिवारी राज्यात अनलॉक-3 ची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानुसार आता मंदिर, बार आणि मॉल उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, विकेंड कर्फ्यूही रद्द करण्यात आल्याने यापुढे शनिवार, रविवार लॉकडाऊन रहाणार नाही. उच्च पातळीवरील एका बैठकीनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज सायंकाळी अनलॉक-3 मार्गसूचीची घोषणा केली.
जिल्ह्यांचे पालकमंत्री, टास्क फोर्सचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी, तिसर्‍या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या त्यानुसार 5 ते 19 जुलैपर्यंत या मार्गदर्शक सूचना अमलात रहाणार आहेत. रात्रीच्या संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सायंकाळी 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू राहील.
सोमवारपासून शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तर बस आणि मेट्रोसह सार्वजनिक वाहतुक 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवीन शिथिलता कोडगू वगळता इतर सर्व जिल्ह्यांना लागू होईल.
थिएटर्स व सिनेमा हॉल बंद राहतील. स्पर्धात्मक प्रशिक्षणार्थ जलतरण तलाव परवानगी देण्यात आली आहे. खेळाचे संकुले व स्टिडिया केवळ सराव उद्देशाने उघडण्यात येतील. मात्र सर्व मोठ्या स्पर्धांना निषिद्ध राहील. परंतु विवाहसोहळा वगैरे वैयक्तिक कार्यांसाठी 100 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले. मंदिरे, मशीदी, चर्च आदी उपासनास्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ती ’दर्शना’साठी उघडण्यात येतील, मात्र इतर सेवांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.
शासकीय व खासगी कार्यालये 100 टक्के कर्मचार्‍यांसह सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील परिस्थितीनुसार संबंधित जिल्हा प्रशासन पुढील निर्बंध आवश्यक असल्यास जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेऊ शकतात.
मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता यासारख्या सार्वजनिक नियंत्रण उपायांवर लक्ष केंद्रित करून कोविड-19 च्या नियमनच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

काय सुरू?
1. सरकारी/खाजगी कार्यालये
2. मॉल
3. मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक
4. मंदिरात केवळ दर्शनास परवानगी
5. केवळ खेळाडूंसाठी जलतरण तलाव
6. खेळाडूंच्या सरावासाठी क्रीडा संकुल
7. बार
8. औद्योगिक व वाणिज्य व्यवहार

काय बंद?
1. शाळा, महाविद्यालये
2. पब
3. चित्रपटगृहे बंद
4. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मेळावे

About Belgaum Varta

Check Also

हलगा-मच्छे बायपास विरोधातील स्थगिती उठवताच जेसीबी दाखल

Spread the love  बेळगाव : हलगा- मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांनी सुमारे दीड दशके चालविलेल्या लढ्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *