खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात पाचव्या दिवशीही सतत मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्रा बाहेर वाहत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या परिस्थितीत मलप्रभा नदीचे पात्र धोक्यात असुन नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे.
गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद कणकुंबी १३३.८ मि मी., जाबोटी १३६. मि मी., लोंढा पीडब्लीडी ६६ मि मी., लोंढा रेल्वे ५६ मि मी., गुंजी ६२.४., असोगा ७४ मि मी., कक्केरी ४८.२ मि मी., बिडी ४४.६ मि मी., नागरगाळी ३९.१ मि मी., तर खानापूर ६३.२ मि मी. पावसाची नोंद आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी पाणीच पाणी
खानापूर तालुक्यातील निलावडे गावापासून जवळ असलेल्या मलप्रभा नदीच्या पात्रात पाणी आल्याने निलावडे रस्त्यावरची वर्दळ थांबली. तर तालुक्यातील अनेक रस्त्याची दयनिय आवस्था झाली आहे.
शिरोली, हेम्माडगा, नागरगाळी, लोंढा, जांबोटी, कणकुंबी भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे खानापूर प्रशासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीच काळजी घेतली नाही. तालुक्यात अनेक भागात झाडे उन्मळुन पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने जागृत राहणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक गावात मुसळधार पावसामुळे घरे पडून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
कणकुंबी, जाबोटी भागात पावसाचा जोर असल्याने मलप्रभा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत गेल्याने शनिवारी मलप्रभा नदी पात्राबाहेर वाहत आहे.
निलावडेत पुलावरून पाणी
निलावडे (ता खानापूर) गावाजवळून जाणाऱ्या मलप्रभा नदीच्या पाण्याने निलावडे गावच्या पूलावरून पाणी जात असल्याने पुलावरून जाणे येणे धोक्याचे झाले आहे.
तालुक्यातील अनेक गावचे रस्ते मुसळधार पावसाने वाहुन गेले आहेत. तालुक्यातील नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत.
त्यामुळे तालुका प्रशासनाने वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र खानापूर तालुका प्रशासन निष्काळजी असलेल्याचे दिसुन येत आहे.