खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यात गेल्या १५ दिवसात ५१ घरे पडली. संबंधित नुकसानग्रस्ताना तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई वेळीच करावी.
यासाठी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थातून होत आहे.
तालुक्यातील पडलेली घरे गर्लगुंजी १, हलसी २, मेरडा २, लोंढा ३, कापोली के जी १, तोपीनकट्टी १, मोदेकोप १, इदलहोंड १, हलगा १, झुंजवाड के जी १, गोधोळी १, सन्नहोसुर १, नंदगड १, चापगांव१, लिंगनमठ ३, अवरोळी १, चिक्कमन्नोळी ३, हिरेहट्टीहोळी ७, गाडीकोप १, पारीश्वाड ६, देवलती २, इटगी ६, बोगूर १, प्रभूनगर १, बिडी १, हंदूर १ अशी एकूण ५१ घरे पडली आहेत.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …