खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -खानापूर रस्त्याचे डांबरीकरण नुकताच करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने बेफाम वेगाने धावत आहेत. अशाने वारंवार अपघात होत आहे. आतापर्यंत या रस्त्यावर सहा अपघात झाले आहेत. भविष्यात पुन्हा अपघात होऊ नये. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यानी या रस्त्यावरील तोपिनकट्टी क्राॅस, माऊली मंदिर, गणपती मंदिर तसेच गर्लगुंजी बेळगाव रस्त्यावरील जनावरांच्या दवाखान्यासमोर, आजोबा मंदिर समोर स्पीड ब्रेक तयार करावे. अशी मागणी गर्लगुंजी ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, संगापा कुंभार, सोमनाथ पाटील, कल्लापा लोहार, जोतिबा सुतार, मारूती मुचंडीकर, परशराम कुंभार, सतीश बुरूड, विठ्ठल लोहार, गणेश देसाई आदी उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …