Monday , September 7 2026
Breaking News

कामांचे श्रेय लाटणार्‍यांवर जरब बसणार; फोटोज लावण्यास निर्बंध

Spread the love

बेळगाव : स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजनांतर्गत हाती घेतलेल्या अनेक कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. यासाठी कामाच्या ठिकाणी आपले छायाचित्र लावत असतात. मात्र, यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत. यापुढे कोणत्याही कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावू नयेत. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
परिवहन खात्याच्या बऱ्याच बस थांब्यावर लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच अनेक विकासकामांची पूर्तता होताच त्याठिकाणी संबधित विभागातील लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावण्यात येत आहेत. मात्र, असे प्रकार नियमाविरुध्द असून कामाच्या ठिकाणी केवळ कामासंबंधी माहिती असणारे फलक किंवा छायाचित्रे लावण्यात यावीत, अशी मागणी माहिती हक्क कार्यकर्ते आणि उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे राजाध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी केली होती.
यानुसार जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याव्दारे जिल्ह्यातील पंचायत राज खात्याच्या बेळगाव व चिकोडी विभागाचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, महापालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, प्रांताधिकारी आदींना सूचना करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *