खानापूर (प्रतिनिधी) : युवकांच्या जागृतीमुळे खानापूर पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचे प्राण बुधवारी युवकांनी वाचविले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी एक युवती मलप्रभा नदीच्या पुलावर आत्महत्या करण्याच्या हेतून आली होती. याचवेळी येथून जाणाऱ्या इब्राहिम तहसीलदार यांना संशय आला. लागलीच त्यांनी त्या मुलीला आत्महत्या करण्यापासून वाचविले. तिची कसुन चौकशी केली असता ती डोंगरगाव (ता. खानापूर) गावची असुन घरातील त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, असे स्पष्ट झाले.
लागलीच पोलिसांना माहिती देऊन तिच्या वडीलांना बोलविण्यात आले. तिच्याबाबत माहिती घेऊन तिला वडीलांसोबत घरी पाठविले.
इब्राहिम तहसीलदार, रवी पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …