
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हिंदू समाजासाठी मलप्रभा नदीघाटावरील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करावी. अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांना खानापूर नगरवासीयांच्यावतीने नुकताच देण्यात आले आहे.
खानापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नविन एक स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी होत होती. यासाठी नगरपंचायतीकडे निधीही मंजूर आहे परंतु निधी दुसरीकडे हलविण्यात येण्याआदी मलप्रभा नदीघाटावरील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनाचा स्विकार नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी स्विकारून स्मशानभूमी निर्माण करू असे अश्वासन दिले.
यावेळी खानापूर शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.