खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.
या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा करतात मात्र त्याच्या दृष्टीस याभागातील रस्ता, गटारी कधी पडणार? आणि रस्त्याचे काम कधी होणार या विवेचनात या विद्यानगरातील नागरिक आहेत.
तेव्हा खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी विद्यानगरातील रहिवासीच्या समस्या जाणून घेणे अतिमहत्वाचे आहे. यासाठी विद्यानगरातील रस्ता आणि गटारीची पाहणी करून विद्यानगरातील रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी विद्यानगरातील रहिवाशांतून होत आहे.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …